- इन्फोमराठी

खरेदीखत म्हणजे काय? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

नमस्कार मित्रांनो इन्फोमराठी या डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण शेती करण्यासाठी, दुकान टाकण्यासाठी, घर बांधण्यासाठी जमिनीचे व्यवहार करताना आपल्या कानावर खरेदीखत हा शब्द नक्कीच आला असेल. पण नेमकं खरेदी खत म्हणजे काय?  ते करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात हे आज या लेखामधून जाणून घेणार आहोत.

जमिनीचा व्यवहार करताना जी रक्कम जमीन घेणारा आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली आहे. ती रक्कम देऊन व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदीखत केले जाऊ शकते. खरेदीखत झाल्यानंतर जमीनीचे मालकी हक्क हस्तांतरीत केले जातात. थोडक्यात एखादी जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण केल्याचा पुरावा म्हणजेच खरेदीखत होय.

ज्या गावभागामध्ये जमीन आहे त्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मुद्रांकशुल्क काढून घ्यावे. दुय्यम निबंधक हा मूल्यांकशुल्क काढून देण्याचे काम करतो.

मुद्रांकशुल्क काढल्यानंतर दुय्यम निबंधक खरेदी खत दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणी शुल्क व कागदपत्रे कार्यालयीन खर्चाची माहिती देतात. तसेच सर्वे नंबर, जमिनीचा प्रकार, जमीन मालकाची नावे, जमिनीचे क्षेत्र, जमीन खरेदी करण्याचे आणि विकणाऱ्या चे प्रयोजन हे सर्व दुय्यम निबंधकाने ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर नमूद करावे लागते.

खरेदीखत तयार करण्यासाठी पुढील कागदपत्रे जोडावी लागतात. यामध्ये सात बारा, मुद्रांकशुल्क, आठ अ, मुद्रांक शुल्काची पावती, प्रतिज्ञापत्र, फेरफार, दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो, NA ऑर्डर ची प्रत ही कागदपत्रे जोडून याबरोबर डाटा एन्ट्री करण्यासाठी लागणारे input भरून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी साठी सदर करावा लागतो.

जमीन खरेदी करताना या गोष्टी आपल्या लक्षात असू द्या तसेच वेळोवेळी बदलणारे नियम व कायदे यांची माहिती घेऊनच व्यवहार करा; म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आम्हाला आशा आहे कि खरेदीखत म्हणजे काय? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

हे आपल्याला समजले असेल. आपल्याला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *