- आरोग्य

15 दिवस दररोज 2 ते 3 खजूर खाल्याने मिळणारे जबरदस्त फायदे

खजूर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असत. खजुरामध्ये अनेक आजारा विरूद्ध लढा देणारे अँटी-ऑक्सिडंट असतात. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का खजूर खाण्याचे अजुन ही बरेच फायदे आहेत. जे आज आपण जाणून घेणार आहोत.

खजुरांमध्ये पोटॅशियम असते आणि ते खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, ज्यामुळे स्ट्रोक, कोलेस्टेरॉल आणि हृदयविकारांना प्रतिबंध व्हायला मदत मिळते. यासाठी दररोज दोन खजूर तरी आपण खाऊ शकता. आपले वजन वाढत नसेल. देहएष्टी किरकोळ असेल तर  वजन वाढविण्यासाठी खजुराचा आहारात समावेश आपण करू शकता.

जर आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर दररोज खजूर आणि दूध घेणे सुरू करा. खजुरामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते. कमजोर असणाऱ्या व्यक्तींनी रोज ४ ते ५ खजूर खाण्यास सुरुवात केली तरी चालू शकेल. खजूर खाल्याने आपला अशक्तपणा कमी होईल.

खजूर खाण्यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये कैल्शियम, मैग्नीशियम, लोह, कॉपर, सेलेनियम हे घटक असतात. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

दररोज खजूर खाण्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच तुम्हाला रातांधळेपणा, रंगांधळेपणा अशा समस्या निर्माण होत नाहीत. यासाठीच दररोज खजूर खाण्यास सुरूवात करा.

खजुरात नैसर्गिक साखर असते. ज्यामुळे शरीराला तत्काळ उर्जा मिळते. व्यायामानंतर लगेच खजूर खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते. खजूरामध्ये फ्लोरीन नावाचा घटक असतो. ज्याच्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची समस्या कमी होऊ शकते. खजूरामुळे तुमच्या हिरड्या आणि दात मजबूत होतात.

ज्यांना अपचन किंवा बद्धकोष्ठताची समस्या आहे अशा लोकांना खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजुरामध्ये तंतूंचे प्रमाण जास्त असते, जेणेकरून पचन योग्य राहते. दररोज रात्री काही  खजूर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठून खा.

खजुरामध्ये भरपूर लोह  असते. त्यामुळे ऍनिमिया झालेल्या लोकांना खजूर खाणे उत्तम आहेत. गर्भवती स्त्रियांनी खजूराचे सेवन केल्यास थकवा दूर होतो. महत्वाची सूचना ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी खजूर खाणे टाळावे अथवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खजूर खावे.

आपल्याला खजूर खाल्याने मिळणारे जबरदस्त फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *