- आरोग्य

व्हिटॅमिन डी कमतरता लक्षणे आणि घरगुती उपाय

निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहारातून जे आवश्यक जीवनसत्त्व आणि पोषक घटक घेत असतो. त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते. आपल्या शरीरातील हाडे, दात आणि स्नायू निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते.

आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी कमतरता असल्याची लक्षणे कोणकोणती असतात? आणि व्हिटॅमिन डी कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारात काय बदल केला पाहिजे.

शरीरात व्हिटॅमिन डी कमतरता असल्यास योग्य आणि पुरेसा आहार घेतल्यानंतर आणि रात्री 7-8 तासांची झोप घेतल्यानंतर ही आपल्याला कायम थकवा जाणवत असेल, तर हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असू शकत.

आपण आहारातून घेत असलेल कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेच असत. शरीरात व्हिटॅमिन डी कमतरता असल्यास सतत पाठदुखी, अंगदुखी, हात पाय दुखणे अशा गोष्टी जाणवू शकतात.

शरीरात व्हिटॅमिन डी कमतरता असल्यास झालेल्या जखमा लवकर भरून येत नाही. शरीरात व्हिटॅमिन डी कमतरता असल्यास चेहऱ्यावर तेज दिसत नाही, चेहरा कायम सुस्तावलेला, नैराश्यपूर्ण दिसू लागतो.

शरीरात व्हिटॅमिन डी कमतरता असल्यास केस गळणे सुद्धा सुरु होते. आता आपण जाणून घेऊयात व्हिटॅमिन डी कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारात काय बदल केला पाहिजे.

व्हिटॅमिन डी कमतरता दूर करण्यासाठी आपण सकाळी कोवळ्या उन्हात 30 मिनिटे बसा अथवा शारीरिक व्यायाम करा. आपल्या आहारात गाईचे दूध, पनीर, दही, संत्राच्या ताजा रस, केळी, गाजर, सोयाबीन, शेंगदाणे, बदाम अक्रोड, काजू, मशरूम, अंड्याचा पिवळा बलक या पैकी ज्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध असतील त्यांचा समावेश आपल्या आहारात करा.

याच सोबत हाडांच्या मजबुतीसाठी शारीरिक व्यायाम जसे कि सूर्यनमस्कार, चालणे, पळणे, सायकल चालवणे, पोहणे योगासने करणे अशा गोष्टी करू शकता. मूड चांगला राहण्यासाठी टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करा. मन शांत ठेवण्यासाठी सकाळी प्राणायाम करा.

आपल्याला आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी कमतरता असल्याची लक्षणे कोणकोणती असतात? आणि व्हिटॅमिन डी कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारात काय बदल केला पाहिजे. ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *