- आरोग्य

प्रवासात उलटी, मळमळ होऊ नये यासाठी घरगुती उपाय

प्रवास करायला आपल्या सगळ्यानाच आवडत. प्रवास केल्याने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन निसर्ग सौंदर्य, कलापूर्ण मंदिर, नवनवीन गोष्टी पाहता येतात. परंतु प्रवासात उलटी, मळमळ होणे असा त्रास आपल्याला झाल्यास आपल प्रवासाचा आनंद घेणं राहून जात.

बरेच जण यामुळे प्रवासाला जाणे टाळतात. प्रवासात उलटी, मळमळ होणे ही समस्या शक्यतो लहान मुल आणि स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत; प्रवासात उलटी, मळमळ होऊ नये यासाठी घरगुती उपाय.

बऱ्याच जणांना वाहनांमधील डिझेल किंवा पेट्रोलच्या वासाने उलटी, मळमळ होणे हा त्रास होतो. यावर सोपा उपाय म्हणजे अशावेळी शक्यतो खिडकीच्या बाजूला बसा. जेणेकरून आपल्याला ताजी हवा घेता येईल आणि आपल्याला उलटी, मळमळ होणार नाही.

प्रवासात उलटी किंवा मळमळ होत असल्यास पुदीना तेल 4 ते 5 थेंब आपल्या रूमालावर घ्या. प्रवासादरम्यान ह्या रुमालाचा वास घ्या. पुदिना तेलाच्या वासाने आपल्याला उलटी, मळमळ होणार नाही.

अचानक प्रवासादरम्यान मळमळ व्हायला लागल्यास आणि आपल्याला वाटतय कि आता उलट्या होऊ शकतात, अशावेळी लवंग चघळा. लवंग चघळल्याने उलटी होणार नाही.

प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होत असल्यास आपण प्रवासादरम्यान लिंबू आपल्या बरोबर ठेवा. जेणेकरून  प्रवासात जेव्हा तुम्हाला उलटी येतेय अस वाटेल त्या वेळी लिंबाचा वास घ्या. आपल्याला बरे वाटेल. प्रवासादरम्यान मळमळ होत असेल तर आपण थोडीशी बडीशेप खाऊ शकता. बडीशेप चावून खाल्लाने मळमळ थांबते.

प्रवासाला बाहेर निघण्याआधी आपल्याला सोबत आल्याचा तुकडा घ्या. जेव्हा आपल्याला मळमळल्या सारखे वाटेल तेव्हा थोडासा आल्याचा तुकडा चघळायचा असे केल्याने मळमळणार नाही.

प्रवासात उलटी मळमळ होऊ नये यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच तिखट पदार्थ पचायला अधिक वेळ लागतो. म्हणून प्रवासाला निघण्यापूर्वी तिखट तेलकट पदार्थ खाऊ नका.

आपल्याला नेहमीच प्रवासात उलटी किंवा मळमळ होणे हा त्रास होत असल्यास शक्यतो खिडकीच्या जवळची सिट आरक्षित करा. कारण खिडकी मधून येणाऱ्या हवेमुळे आपल्याला मळमळ होणार नाही.

त्याचबरोबर आपण झोपून हि प्रवास करू शकता. तसे केल्याने आपल्याला मळमळणार नाही. आपल्याला प्रवासात उलटी, मळमळ होऊ नये यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *