- आरोग्य

केसांना चाई लागणे “एलोपेसिया” घरगुती उपाय

स्त्री असो वा पुरुष केस गळणे हि एक सामान्य गोष्ट आहे. मात्र केस प्रमाणाच्या बाहेर गळायला लागले कि चिंता वाटू लागते. अचानक एका ठरविक जागेवरचे केस गळून त्या ठिकाणी पडलेल्या गोलाकार चट्टयाला चाई लागणे किंवा एलोपेसिया असे म्हणतात.

बऱ्याचदा हि समस्या अनुवांशिक असते. तसेच हार्मोन्स बदलामुळे, मानसीक तणावामुळे देखील हि समस्या आपल्याला होऊ शकते. आहारात योग्य तो बदल केल्याने आणि काही घरगुती उपायांनी आपण ह्या समस्येवर मात करू शकतो.

आपल्या केसांना चाई लागली असल्यास मांस, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, गोड पदार्थ, बेकरी उत्पादने, तळलेले पदार्थ, आम्लयुक्त पदार्थ आणि जळजळ निर्माण करणारे इतर पदार्थ खाणे टाळा.

आपल्या केसांना चाई लागली असल्यास त्या जागी परत केस येण्यासाठी जास्वंद फुलाचा रस त्याभागावर लावू शकता. जास्वंद फुलाचा रस लावल्याने बऱ्याच जणांना चांगले परिणाम दिसून आलेले आहेत. तसेच कांद्याचा रस चाई आलेल्या भागावर लावल्याने देखील केस परत यायला मदत मिळते.

केसांना चाई लागल्यावर आपल्याला टक्कल तर पडणार नाही ना? याची चिंता करू नका. कारण चिंता केल्याने तणाव येतो आणि अजून केस गळू लागतात.

केस निरोगी राहण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळ असू द्या. तसेच पुरेसे पाणी प्या. रात्री पुरेशी झोप घ्या. सारखे सारखे शाम्पू बदलू नका. केस मजबूत होण्यासाठी केसांना नारळाच्या तेलाने मालिश करत जा.

आपल्याला केसांना चाई लागणे “एलोपेसिया” घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *