- आरोग्य

कांजण्यांचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

कांजण्या हा संसर्गजन्य रोग प्रामुख्याने लहान मुलांना होतो. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. लहान वयामध्ये कांजण्या आल्या नाही तर मोठेपणी येण्याची शक्यता असते.

कांजण्या आल्यावर त्वचेवर लाल रंगाचे खाजवणारे अन वेदनादायी पुरळ दिसायला लागतात. हे पुरळ पाठीवर, छातीवर, पोटावर असे संपूर्ण शरीरावर यायला सुरुवात होते. काही घरगुती उपाय केल्यास काही दिवसानंतर कांजण्यामुळे झालेल्या जखमा बऱ्या देखील होतात.

मात्र कांजण्या गेल्यावर ज्या ठिकाणी कांजण्यामुळे फोड पुरळ आले होते त्याजागी डाग तसेच राहतात. कांजण्याचे जखमा अथवा डाग दिसायला खूपच खराब वाटतात. या डागांमुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. म्हणूनच आज आपण कांजण्यामुळे  त्वचेवर पडलेले डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

कडुलिंब हे कांजण्याचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ धुवा. एक आठवड्यामध्ये कांजण्याचे डाग, खाज कमी व्हायला मदत मिळेल.

कांजण्याचे डाग घालवण्यासाठी कोरफड गर उपयुक्त आहे. कोरफड गर लावल्याने अंगावरील कांजण्याचे डाग कमी व्हायला मदत मिळते. यासाठी थोडासा ताजा कोरफड गर एका वाटीत घ्या.

रात्री झोपण्याआधी आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी कांजण्यांचे डाग आहेत त्याभागावर हलक्या हाताने कोरफड गर लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने धुऊन टाका.

असे केल्याने काही दिवसात कांजण्याचे डाग निघून जातील. जर आपल्या इथे कोरफड गर उपलब्ध नसेल तर आपण मेडिकलमध्ये मिळणारे कोरफड जेल वापरू शकता. कांजण्याचे डाग घालवण्यासाठी पपईचा गर काढून तो दुधामध्ये मिसळून त्यामध्ये थोडीशी साखर घालून त्याची पेस्ट बनवा.

ही पेस्ट शरीरावर ज्या ठिकाणी कांजण्याचे डाग आहेत त्या ठिकाणी लावा. पंधरा मिनिटात पर्यंत ठेवा आणि काही वेळानंतर धुऊन टाका. काही  दिवस हा उपाय केल्यानंतर कांजण्याचे डाग निघून जातील.

कांजण्याचे डाग घालवण्यासाठी चंदनाची पावडर गुलाब पाण्यात मिसळून ज्या ठिकाणी डाग आहेत त्या ठिकाणी लावा. 30 मिनिटे राहू द्या त्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. चंदनामध्ये डाग कमी करण्याचे गुण असतात.

चंदन गुलाबपाण्यात मिक्स करून लावल्याने आपली त्वचा देखील ग्लो करेल. कांजण्याचा त्रास कमी करण्यासाठी नारळाचे तेल उपयुक्त आहे. नारळाच्या तेलाने मालिश केल्याने हे डाग निघून जाऊ शकतात. यासाठी नियमितपणे काही दिवस कांजण्याच्या डागावर शुद्ध नारळाचे तेल लावा.

आपल्याला कांजण्यांचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *