- इन्फोमराठी

आठ अ उतारा म्हणजे काय? जाणून घ्या हा उतारा ऑनलाईन कसा पहावा आणि त्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो इन्फोमराठी या डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करा.

जमीन खरेदी विक्री करण्यासाठी सातबारा उतारा, आठ अ, मोजणी ह्या गोष्टींची आपल्या माहिती असणे गरजेच असत. या आधीच्या लेखामध्ये आपण या विषयी माहिती घेतली आहे.

या लेखात आपण एकाच व्यक्तीच्या नावावर गावातील किती जमीन आहे हे दर्शविणाऱ्या आठ अ च्या उताऱ्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहुयात आठ अ चा उतारा ऑनलाईन कसा पहावा आणि त्याचे फायदे काय आहेत.

एखाद्या जमीन मालकाकडे किती आणि कोणत्या प्रकारची जमीन आहे हे सातबारा उताऱ्यावरून कळते. तर एकाच व्यक्तीच्या नावावर एकाच गावात वेगवेगळ्या ठिकाणी किती जमीन आहे हे आठ अ उताऱ्यावरून कळते.

ह्या उताऱ्याचा उपयोग करून तलाठी जमिनीचा महसूल आकारतात. म्हणून हा उतारा महत्वाचा आहे. आता आपण बघुयात घरबसल्या आपल्याला आठ अ चा उतारा कसा पाहता येईल.

यासाठी सर्वप्रथम आपण गुगल ह्या वेबसाईटवर जा त्यानंतर तिथे असलेल्या सर्च ह्या पर्यायावर क्लिक करून तिथे https://bhulekh.mahabhumi.gov.in/ असे टाकून सर्च करा. त्यानंतर महाराष्ट्र शासनाची या अधिकृत वेबसाईट निवडा.

महाभुमी ह्या वेबसाईटवर आल्या नंतर ”विभाग निवडा” या ठिकाणी क्लिक करा. यातून तुम्ही तुमचा प्रशासकीय विभाग निवडून Go या बटनावर क्लिक करा. त्यानंतर विभागाच्या पेज वर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. यात सातबारा आणि आठ अ हे पर्याय दिले आहेत.

त्यातील आठ अ या पर्यायावर क्लिक करा आणि जिल्हा – तालुका – गाव – सर्वे नंबर/ गट नंबर अथवा ज्यांच्या नावे आठ अ उतारा आहे त्यांचे पहिले, मधले,संपूर्ण नाव यापैकी एक नाव निवडा आणि शोध या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या समोर एक लिस्ट ओपन होईल त्यातून तुमचे संपूर्ण नाव शोधा. पुढे मोबाईल क्रमांक टाका आणि खाली दिलेल्या ‘आठ अ’ या बटनावर क्लिक करा. आलेला कॅप्चा कोड टाका आणि व्हेरिफाय या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही आठ अ चा उतारा पाहू शकता.

या उताऱ्याचा फायदा असा की वेगवेगळ्या गटात असलेली एकाच व्यक्तीची एकूण किती जमीन आहे हे कळते. तसेच या उताऱ्याचा उपयोग शासन कर गोळा करण्यासाठी करते.

जमीन विक्री करताना जमीन मालकाची माहिती हा उतारा बघून जमीन खरेदी केल्याने फसवणूक टाळता येऊ शकते. त्यामुळे जमिनीचे व्यवहार करताना उतारा महत्वपूर्ण मानला जातो.

आम्हाला आशा आहे कि आठ अ चा उतारा म्हणजे काय? आणि आठ अ  उतारा ऑनलाईन कसा पहायचा हे आपल्याला समजले असेल. आठ अ  उताऱ्याबद्दल आपण विचारलेल्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे या लेखामधून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्याला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *