- आरोग्य

केस गळणे कमी करण्यासाठी आहारात काय बदल करावा?

केस गळणे कमी करण्यासाठी आपण योग्य आहार घेणे गरजेचे असते. जर आपल्या शरीरामध्ये विटामीन, मिनरल, खनिजे यांचे प्रमाण योग्य नसेल तर केस गळू शकतात. केस गळणे कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या अन्न पदार्थांचा समावेश केला पाहिजे हे तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळेल.

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असते जे केसांच्या वाढीसाठी गरजेचे असते. केसांना दाट, चमकदार करण्यासाठी आणि शरीरामध्ये रक्त संचार वाढविण्यासाठी,  आहारात गाजराचा समावेश केल्याने केस गळणे समस्या कमी होते.

केस गळणे कमी करण्यासाठी आपल्या आहारात अंड्याचा समावेश करा. अंडी हे बायोटिनचा चांगला स्रोत असतात. बायोटिन केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पालक ही अशी भाजी आहे जी अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे.

पालक भाजी ही लोहाचा चांगला स्रोत आहे. तसेच यात व्हिटॅमिन ए, सी आणि प्रोटीन आहे. पालकमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे केसांना नैसर्गिक कंडिशनर मिळते. याशिवाय ओमेगा ३ ऍसिड, मँगनेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे घटक मिळतात. हे सर्व घटक आपल्या केसांसाठी पोषक असतात. आहारात पालकचा समावेश केल्याने केस गळणे कमी होऊ शकते.

अक्रोडमध्ये बायोटिन, विटामीन ई, व्हिटामिन बी1, विटामीन बी6, आणि विटामीन बी9 असे पोषक घटक असतात. यासोबतच अक्रोडमध्ये प्रोटीन आणि मँगनेशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अक्रोडचे सेवन केल्याने केस सुदृढ राहतात. यात असलेल्या पोषक तत्वांमुळे स्काल्पला योग्य पोषण मिळते. आणि केस गळणे कमी होते.

प्रोटीन, लोह, झिंक आणि बायोटिन या सर्व पोषक तत्वांचा उत्तम स्रोत म्हणजे कडधान्याच्या डाळी. डाळींमध्ये फॉलिक ऍसिड असते, जे लाल रक्त पेशींची वाढ करते. आणि केस मजबूत करते. म्हणून केस गळणे कमी करण्यासाठी आपण आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश करा.

आहारात स्टॉबेरीचा समावेश केल्याने केस गळणे कमी होऊ शकते. स्टॉबेरीमध्ये सिलिका असते, जे केसांना मजबुती देण्यास आणि केसांच्या विकासासाठी उपयुक्त असते. तसेच पेरूमध्ये संत्र्यापेक्षा ५ पट अधिक व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे केसांचे गळणे कमी होते

आपल्याला केसांचे गळणे कमी करण्यासाठी आहारात काय बदल करावा? ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. आपल्याला यापैकी एखादा उपाय आधी करत असताना काही चांगला अनुभव आला असेल तर तो कमेन्टमध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *