बराच वेळ एकाच स्थितीत बसून किंवा उभे राहिल्यामुळे स्नायूंवर ताण येतो, त्यामुळे कंबर दुखायला सुरुवात होते. पूर्वी म्हातारपणात होणारा हा आजार आता कमी वयात होताना दिसत आहे. आज आपण जाणुन घेणार आहोत कंबरदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय. कंबर दुखत असल्यास मोहरीच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा असे केल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळेल.
कंबर दुखत असल्यास थोडेसे बर्फाचे तुकडे घ्या ते प्लास्टिकची पिशवी असल्यास त्यामध्ये ठेवा. अन ज्या ठिकाणी दुखत आहे त्या जागेवर हलक्या हाताने २ मिनिटे ती बर्फाची पिशवी फिरवा. थोड्या थोड्या वेळाने अस करा. यामुळे कंबर दुखीच्या वेदना कमी होतील.
कंबर दुखत असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडेसे सैंधव मीठ टाकुन आंघोळ करा. सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायु मोकळे होण्यास मदत मिळते. कंबर दुखीपासून आराम मिळतो.
कंबरदुखी कमी करण्यासाठी आले खूप गुणकारी आहे. यासाठी आपण दररोज 5-6 आल्याचे छोटे तुकडे एक कप पाण्यात 10 मिनिटे उकळून नंतर ते थंड होऊ द्या. त्यानंतर त्या पाण्यात मध मिसळून प्या. असे रोज केल्याने कंबरदुखी पासून आराम मिळेल.
नेहमीच कंबर दुखीचा त्रास होत असल्यास योगासन करा. कंबरेचे स्नायू मजबूत होतात. योगासन करताना एक गोष्ट लक्षात असुद्या सवय नसताना वेडीवाकडी योगासने करू नका. जाणकार प्रशिक्षकांकडूनच योगासन शिका मगच करा. वारंवार कंबरदुखी होऊ नये यासाठी पुढील गोष्टी आपण करू शकता.
आहारात पुरेश्या प्रमाणात दूध आणि दुधाच्या पासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश असुद्या शरीरातील कैल्शियम च्या कमीमुळे सुद्धा कंबर दुखु शकते. प्रमानापेक्षा जास्त वजन वाढल्याने सुद्धा कंबर दुखीचा त्रास सुरु होऊ शकतो त्यामुळे वजन नियंत्रणात असुद्या.
कंबर दुखीचा त्रास होत असल्यास पोहणे, सायकल चालवणे, कंबरेसाठी उत्तम व्यायाम आहेत. हे सुद्धा आपण करू शकता. उंच टाचांचे सँडल / शूज वापरल्याने कंबरेच्या स्नायूंवर ताण येतो आणि कंबर दुखु लागते. त्यामुळे प्रमाणापेक्षा उंच टाचांचे सँडल / शूज वापरू नका.
आपल्याला कंबरदुखी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. आपण यापैकी एखादा उपाय आधीपासून करत असताना काही चांगला अनुभव आला असेल तर तो कमेन्टमध्ये सांगा.
अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.