- इन्फोमराठी

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात; उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा?

नमस्कार मित्रांनो इन्फोमराठी या डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करा.

केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. या सोबतच विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध सरकारी योजनांसाठी, शासनाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला असावा लागतो.

शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेली असते. त्यानुसार आपल्याला योजनांसाठी अर्ज द्यावा लागतो. ह्या अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो. म्हणूनच आज आपण सोप्या भाषेत उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याविषयी जाणून घेणार आहोत.

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्व माहितीभरून कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज तहसील कार्यालयात जमा करू शकता. हा अर्ज जमा केल्यानंतर आपल्याला  १५ दिवसांच्या आत उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो.

या शिवाय उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपण शासनाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ ह्या वेबसाईटला भेट देऊन घरबसल्या उत्पन्नाचा दाखला अर्थात मिळकत प्रमाणपत्र मिळवू शकता.

आपल्या गावात सेतू अथवा महा ई सेवा केंद्र असेल तर तिथेसुद्धा सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उत्पन्नाचा दाखला आपल्याला मिळू शकतो. वरती दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला जो सोपा वाटेल त्या पद्धतीने आपण उत्पन्नाचा दाखला/मिळकत प्रमाणपत्र काढू शकता.

यापैकी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला तर आपण केलेला अर्ज तहसील कार्यालयातील क्लार्कच्या हाती जातो. त्यानंतर पुढे नायब तहसीलदार संपूर्ण कागदपत्रांची छाननी करून आपल्या अर्जाला मंजुरी देऊ शकतात.

आता आपण जाणून घेऊयात उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता पडू शकते.  उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याकडे पॅन कार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, रोजगार हमी योजनेचे ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, अथवा ज्यावर आपला फोटो आहे असे शासनाकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र आपल्याजवळ असणे गरजेचे आहे.

त्यानंतर पत्त्यासाठी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, पाणी बील, वीजबील, घरपट्टी, 7/12 आणि 8 अ चा उतारा यापैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे.

जर आपल्याला वैद्यकीय कारणांसाठी उत्पन्नाचा दाखला हवा असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आपल्याला अर्जासोबत जोडावा लागेल. आपले उत्पन्न किती आहे हे समजण्यासाठी पुढील कागदपत्रे आपल्याला अर्जासोबत जोडावी लागू शकतात.

जर आपण इन्कम टॅक्स भरत असाल तर त्याचे प्रमाणपत्र, मंडल अधिकाऱ्याचा तपासणी अहवाल, जर आपण नोकरदार असाल तर फॉर्म नंबर 16, जर आपण निवृत्त पेन्शनधारक असाल तर बँक प्रमाणपत्र, आणि आपण शेतकरी असाल तर 7/12 आणि 8 अ चा उतारा आपल्याला अर्जासोबत जोडावा लागेल.

ह्या साऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून आपण अर्ज जमा केल्यानंतर साधारणपणे 15 दिवसाच्या आत आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो. आम्हाला आशा आहे कि उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा? आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे आपल्याला समजले असेल. उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल आपण विचारलेल्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे या लेखामधून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्याला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *