- आरोग्य

ह्या भाजीचा आहारात समावेश केल्याने राहाल अनेक आजारांपासून दूर

निरोगी राहण्यासाठी आपले पूर्वज आहारात रानभाज्यांचा समावेश करायचे कारण त्यांना त्या भाज्यांचे औषधी गुणधर्म माहित होते. आपल्यापैकी बरेच जण शहरात राहत असल्याने त्यांना ह्या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म माहित नसतात. म्हणूनच आज आपण इन्फोमराठीच्या ह्या लेखामधून अश्याच एका रानभाजी बद्दल जाणून घेणार आहोत.

छायाचित्र बघून बऱ्याच जणांनी हि भाजी ओळखली असेल मात्र बऱ्याच जणांना त्यांच्या भागात ह्या भाजीला काय म्हणतात हे माहित नसेल म्हणून आपण कमेंट मध्ये आपल्या भागात ह्या भाजीला कोणत्या नावाने ओळखतात हे सांगा.

चला तर आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. आज आपण ज्या भाजी बद्दल जाणून घेणार आहोत त्या भाजीचे नाव आहे करटूले हि भाजी बाहेरून कारल्या सारखी काटेदार, हिरवीगार आणि आकाराने वांग्यापेक्षा लहान असते.

पिकल्यानंतर ह्या भाजीचा रंग पिवळसर पोपटी दिसू लागतो. जरी हि भाजी दिसायला कारल्यासारखी असली तरी कारल्या इतकी कडवट नसते. करटूल्याच्या भाजीमध्ये एंटीऑक्सीडेंट, प्रोटीन, आयरन, फायबर असे भरपूर पोषक घटक असतात.

करटूल्याच्या भाजीमध्ये कॅलरीज अत्यल्प असल्याने आपण जर वजन कमी करत असाल तर आपण ह्या भाजीचा आहारात समावेश करू शकता. याशिवाय करटूल्याच्या भाजीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात.

त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आपण ह्या भाजीचा आहारात समावेश करू शकता. करटूल्याच्या भाजीचा आहारात समावेश केल्याने उच्च रक्तदाब संतुलित करण्यासाठी देखील मदत मिळते.

करटूल्याच्या भाजीमध्ये एंटी-एलर्जी, एंटीऑक्सीडेंट, एंटीबैक्टीरियल घटक असल्याने ह्या भाजीचा आहारात समावेश केल्याने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

करटूल्याच्या भाजीचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात करण्यासाठी देखील मदत मिळते. ताज्या करटूल्याचा रस त्वचेवर लावल्याने मुरुम आणि पुरळ बरे होतात.

आपल्याला “करटूले भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे” ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. करटूले भाजी खाल्याने आपल्या काही चांगला अनुभव आला असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *