- आरोग्य

उंदरापासून सुटका करण्यासाठी घरगुती उपाय

घरात उंदीर असले की कपड्यांपासून अगदी स्वयंपाकघरातील पदार्थ, धान्य, कपडे किंवा इतर महागडी वस्तू, इलेक्ट्रोनिक्स वस्तू, पुस्तक अशा गोष्टीना जपणं एक मोठं आव्हान होऊन बसतं. उंदीर आपले किमती सामानाची नासधूस करतात.

उंदीर घरात नुसती नासधूसच करत नाहीत तर त्यांच्यामुळे अनेक आजार हि पसरण्याचा देखील धोका असतो. म्हणून जर उंदराला मारल्याशिवाय त्याने घराबाहेर जाव अस वाटत असेल तर हे घरगुती उपाय नक्कीच तुमच्या उपयोगी पडू शकतात.

उंदराने स्वयंपाकघरातील गोष्टी अनवधानाने खाल्ल्या तर आपल्या आरोग्यासाठी देखील हे धोकादायक ठरू शकते. उंदरांमुळे घरात आजार पसरण्याचा धोका असतो. बऱ्याचदा उंदीर घाणीच्या जागी जास्त प्रमाणात येतात, कोंदट आणि अडगळीच्या ठिकाणी उंदरांचा वावर जास्त असतो. यासाठी घरामध्ये स्वच्छतेची काळजी घ्या आणि कोठेही घाण होऊ देऊ नका.

जर उंदीर घराबाहेर पळत नसतील तर आपण त्यांना पकडण्यासाठी बाजारातून सापळा खरेदी करा आणि उंदरांची आवडती वस्तू त्यात घाला, उंदीर ते खायला येताच ते सापळ्यात अडकतील आणि मग आपण त्यांना कुठेतरी सोडू शकता.

उंदरांना कोणताही उग्र वास सहन होत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणाहून उंदीर घरात शिरतो असं वाटतं किंवा लपला आहे असं वाटतं. तिकडे कापसाच्या बोळ्यावर पुदीन्याचं तेल लावून ठेवा.

आपल्याला माहित आहे की उंदीर हे मांजरीचे आवडते अन्न आहे, म्हणून उंदीरांचा त्रास टाळण्यासाठी घरात मांजरी ठेवा, उंदीर घरात येणार नाही. उंदरांना कोणताही उग्र वास सहन होत नाही.

त्यामुळे आपल्या घरात ज्या ठिकाणाहून उंदीर शिरतो अशा जागी कांदा कापून ठेवा. कांद्याच्या उग्र वासामुळे उंदीर येण्याची शक्यता कमी होते. स्वयंपाकघरात अन्नपदार्थ उघडे अथवा जमिनीवर ठेवू नका. सर्व प्रकारचे अन्नपदार्थ व धान्य व्यवस्थित डबाबंद ठेवा. उंदरांच्या लपण्याच्या ठिकाणी केसांचा गुच्छ ठेवल्याने उंदीर त्या ठिकाणी येत नाही.

पुदीना उंदरांच्या मध्ये भीती निर्माण करते. पुदीन्याची पाने किंवा फुले उंदीरांच्या बिळामध्ये टाकावी किंवा जर घरात उंदीर असतील तर घरात जेथे जेथे उंदरांचा वावर असतो तेथे पुदीना टाकावा याच्या वासामुळे उंदीर घराबाहेर पळून जातील.

फिनाइलच्या गोळ्या कपड्यामध्ये ठेवल्यामुळे उंदरांचा त्रास कमी होतो. फिनाइलच्या गोळ्यांमुळे उंदीर घरात येणार नाहीत. उंदरांच्या लपण्याच्या ठिकाणी लाल मिरचीची पावडर ठेवा. उंदीर घरात घुसण्याआधी नक्कीच विचार करेल.

आपल्या घरात उंदीर येऊ नये यासाठी घरातील कचरा वेळच्यावेळी कचरा कुंडीत टाका. खाण्याचे पदार्थ ठेवण्याचे डबे व्यवस्थित झाकून ठेवा. खाण्या पिण्याच्या गोष्टी घरात सांडून देऊ नका. असे केल्याने आपल्या घरात उंदीर होणार नाही.

आपल्याला उंदरापासून सुटका करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल.  महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *