- आरोग्य

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपण बघितले असेल बऱ्याच लोकांच्या मानेवर, हातावर, पायांवर, चेहऱ्यावर, पाठीवर चामखीळ असतात. चामखीळ हि वेदनादायी जरी नसली तरी मानेवर आणि चेहऱ्यावर असणाऱ्या चामखीळमुळे आपला चेहरा, मान विचित्र दिसू लागते.

चामखीळ लेझर ट्रीटमेंटने काढता येऊ शकते मात्र ते खूप खर्चिक असल्याने आज आपण चामखीळ घालवण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत. मात्र याठिकाणी आपल्याला आवर्जून एक गोष्ट सांगाविशी वाटते, आता आपण जे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यांचा परिणाम हळूहळू होतो. चामखीळ पूर्णपणे निघून जाण्यासाठी आपल्याला हे उपाय नियमित काही आठवडे करावे लागू शकतात.

चामखीळ घालवण्यासाठी नियमित दिवसातून ३ वेळा अपल सायडर व्हिनेगरचे काही थेंब कापसावर घेऊन चामखीळ असलेल्या भागावर लावून ठेवायचे आहे. असे केल्याने काही दिवसात चामखीळीचा रंग बदलेल आणि हळहळू चामखीळ सुकून नाहीशी होईल.

चामखीळ घालवण्यासाठी लसणाचा रस देखील प्रभावी असतो. यासाठी लसणाच्या 2 ते पाकळ्या ठेचून त्याचा रस कापसावर घ्या त्यानंतर तो कापूस चामखीळ असलेल्या भागावर लावून ठेवा. चांगल्या परिणामासाठी  दिवसातून 2 वेळा हा उपाय आपण करू शकता. काही दिवस हा उपाय केल्याने देखील चामखीळ नाहीशी होते.

चामखीळ घालवण्यासाठी चमचाभर एरंडेल तेलात थोडासा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट चामखीळवर लावा. काही दिवस हा उपाय केल्याने देखील चामखीळ नाहीशी होते.

आपल्याला चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *