- आरोग्य

आल्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे

आल्याचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही तर अनेक आजारांशी लढायलाही मदत करतो. आल्याचे अनेक औषधी फायदेही आहेत. आले हे विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई आणि विटामिन बी-कॉम्प्लेक्स यांचा चांगला स्रोत असते.

याशिवाय आल्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, जस्त, कॅल्शियम असे अनेक पोषक घटक हि असतात. चला जाणुन घेउयात आल्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे. जेव्हा कधी आपल्याला कोणतेही काम करायची इच्छा वाटत नसेल तर फक्त एक कप आल्याचा चहा त्वरीत बनवा आणि प्या यामुळे आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळेल.

आल्याचा चहा प्यायल्याने खोकला, सर्दी, पडसे, घसा खवखवणे वगैरे पासून तुम्हाला आराम मिळेल. आल्याचा चहा प्यायल्याने तोंडाला येणारी दुर्गंधी बऱ्याच अंशी कमी होते.

जर तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आले  भूक वाढविण्यात मदत करते. आल्याचा चहा रक्ताभिसरण सुधारतो.  तसेच पाचन तंत्राला अधिक चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करतो. वात, पित्ता आणि कफासारखे दोष दूर करण्यात उपयोगी असतो.

आल्याचा चहा हृदयासाठी चांगला असतो यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहायला मदत मिळते. आल्यामुळे अनावश्यक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, त्यामुळे हृदयरोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

चहा फायदेशीर असला तरी हे विसरून नका चहामध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असल्याकारणामुळे दिवसातुन दोन वेळा चहा पेक्षा जास्त वेळा चहा शक्यतो टाळा.

आल्याचा चहा आरोग्यासाठी चांगला असला तरी कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केल्यास त्याचा त्रास होतो. म्हणून प्रमाणतच त्याचे सेवन करा. शिवाय आले हे उष्ण गुणधर्म असणारे आहे त्यामुळे आल्याचा चहा देखील प्रमाणातच प्या.

आपल्याला आल्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल.महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *