- आरोग्य

गजकर्ण घालवण्यासाठी घरगुती उपाय

गजकर्ण हा एक संसर्गजन्य त्वचा विकार आहे. गजकर्ण झाल्यावर त्वचेवर गोलाकार लालसर चट्टा पडतो. ज्यावर अत्यंत खाज येत असते. असह्य खाजेमुळे आपण गजकर्ण झालेल्या जागेवर खाजवतो. त्यामुळे नखां मार्फत इतर निरोगी त्वचेला त्याची लागण होते.

हा त्वचा विकार व्यवस्थित न वाळलेले कपडे वापरल्याने, नियमित आंघोळ न केल्याने, गजकर्ण झालेल्या व्यक्तीचे कपडे, कंगवा, साबण वापरल्याने पसरतो. बऱ्याचदा गजकर्ण मानेवर, कानाच्या मागे, कंबरेला, बगलेत, मांडयावर येत असतात. आज आपण गजकर्ण झाल्यास ते घालवण्यासाठी काय करता येऊ शकतो या विषयी माहिती घेणार आहोत.

गजकर्ण घालवण्यासाठी आपण झेंडूच्या फुलाचा उपयोग करू शकता यासाठी झेंडूच्या फुलाच्या काही पाकळ्या बारीक करून त्याचा रस दिवसातून 2 वेळा गजकर्ण आलेल्या जागेवर लावा. काही दिवसात गजकर्ण नाहीसे होईल.

झेंडूच्या फुलामध्ये बरेच अँटी-फंगल आणि अँटी-एलर्जीक गुणधर्म असतात, ज्यामुळे गजकर्ण, खरुज किंवा खाज सुटणे यासारख्या समस्या मुळापासून दूर होतात. जर आपल्याला बऱ्याच दिवसांपासून खाज सुटण्याची समस्या येत असेल तर यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता.

अपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. गजकर्ण घालवण्यासाठी आपण अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करू शकतो. यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर थोडेसे अपल सायडर व्हिनेगर घ्या.

हलक्या हाताने ते गजकर्ण आलेल्या ठिकाणी लावा. चांगल्या परिणामासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा आपण हा उपाय करू शकता. ह्या उपायाने आठवड्याभरात गजकर्ण नाहीशे होऊ शकते.

गजकर्ण घालवण्यासाठी ओल्या हळदीचा रस काढा व तो गजकर्णाच्या चट्ट्यांवर लावा. काही दिवसात गजकर्ण नाहीसे होईल. याबरोबरच एक चमचा हळदीचा रस व तेवढाच मध मिसळून सकाळी अनशापोटी घ्यावा.

गजकर्ण घालवण्यासाठी तुळशीची पाने चांगली धुवून पाण्यात उकळा. आणि नंतर आंघोळीच्या पाण्यात मिसळा. या पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या शरीरावर खाज येणे बंद होईल.

गजकर्ण आलेल्या ठिकाणी तुळशीच्या पानाच्या रसामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून लावा. लिंबाच्या रसात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेच्या जिवाणू नष्ट होतात. लिंबाचा रस त्वचेचा रंग सुधारतो.

गजकर्णाच्या चट्ट्यावर कच्च्या पपईच्या फोडी घासाव्यात किंवा पपईच्या बिया वाळवून त्यांची पूड पाण्यात मिसळून ती चट्ट्यांवर लावावी. असे केल्याने काही दिवसात गजकर्ण नाहीसे होईल.

गजकर्ण येऊ नये यासाठी दहयाचा आपल्या आहारात समावेश असुद्या. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात चांगले बॅक्टेरिया असतात, जे गजकर्णाच्या संक्रमणास रोखतात.

आपल्या त्वचेवर गजकर्ण येऊ नये यासाठी आपण आंघोळीचे पाणी गरम करताना त्यामध्ये थोडीशी कडुलिंबाची पाने हाताने तुकडे करून टाकू शकता. कडुलिंबाची पानामधील औषधी गुणधर्मामुळे आपल्या अंगाला खाज येणे थांबते. तसेच बरेचशे त्वचा विकार नाहीशे होतात.

आपल्याला गजकर्ण घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *