- आरोग्य

पोटाची चरबी वाढवणाऱ्या ह्या 5 सवयी आजपासून बदला

आजकाल आपली जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. पूर्वी ज्या ठिकाणी जिने होते तिथे आता लिफ्ट्स आल्यात. बाहेर फिरायला जायचं म्हटल तर पूर्वी सायकलचा वापर व्हायचा आता सायकलची जागा दुचाकी, चारचाकी वाहनांनी घेतली आहे.

कॉम्पुटर, मोबाईलमुळे बरीचशी काम आता घरबसल्या होऊ लागली आहेत. आपल्या आहारात सुद्धा बदल झालेत पूर्वी बाहेर कामाला जाणारी माणस घरून डबा न्यायची आजकाल याची जागा फास्टफूडने घेतली आहे.

ह्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपण बराच वेळ एकाच जागी बसून काम करत असतो. एकाच जागी बसल्यामुळे शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. शारीरिक हालचाली कमी झाल्याने आपण जे अन्न खातो.

त्याचे पचन होऊन त्यापासून आपल्या शरीरात जी उर्जा निर्माण होते तिचा वापर न झाल्याने ती शरीरात साठवली जाते. काही काळाने ह्या उर्जेच रुपांतर चरबी मध्ये होत. हि चरबी जमायला लागली कि आपले पोट सुटते.

जितका आपल्या हातांचा वापर काम करण्यासाठी होतो, पायांचा वापर चालण्यासाठी होतो तितका वापर आपल्या पोटाचा होत नाही. पोटातील अवयवांचे मुख्य कार्य अन्न पचन करणे त्यापासून उर्जा निर्माण करून शरीरातील इतर भागात त्या उर्जेला पाठवणे हे असते.

हे कार्य दिवस रात्र निरंतर आपल्या शरीरात सुरु असते. शारीरिक हालचाली करण्यासाठी हातांचा आणि पायाचा वापर जास्त होत असतो. त्या भागांपेक्षा शारीरिक हालचाली करण्यासाठी पोटाचा वापर हा कमी प्रमाणात होत असल्याने पोटाभोवती चरबी जमा होते.

आपण आपल्या घरातल्या जुन्या जाणत्या माणसांच्या तोंडून ऐकल असेल कि एका जागी बसू नको भोपळयासारखा होशील! तर यागोष्टी मागे असलेल कारण आता आपल्याला समजल असेल.

पोटाभोवती चरबी जमा होण्याची आणखी हि कारणे आहेत ती आता आपण जाणून घेऊयात. जसजस आपल वय वाढत तशी तशी आपली पचनसंस्था कमकुवत होत जाते. त्यामुळे आपण खालेल अन्न पचन व्हायला अधिक वेळ लागतो. यामुळे देखील पोटाची चरबी वाढते.

थायरॉईड आणि डायबेटीस सारख्या आजारांमुळे देखील आपले वजन झपाट्याने वाढू शकते. स्त्रियांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर हार्मोनची पातळी कमी व्हायला सुरुवात होत असते. रजोनिवृत्ती इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होणे यामुळे देखील वजन वाढू शकत.

जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा शरीरातील रक्तामध्ये असणाऱ्या कोर्टिसोलची पातळी वाढू लागते. कोर्टिसोलमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते, त्यामुळे चरबीच्या पेशी मोठ्या होतात; आणि पोटाभोवती चरबी वाढते.

पोटाभोवती चरबी वाढण्याच अजून एक महत्वाच कारण म्हणजे अति प्रमाणात जेवण करणे, भूक नसताना हि जेवणे, तेलकट मसालेदार, मैद्याचे पदार्थ, फास्टफूड खाणे यामुळे देखील झपाट्याने चरबी वाढू शकते.

आता आपण जाणून घेऊयात पोटाची चरबी वाढू नये यासाठी कोणत्या सवयी आपण स्वताला लावू शकतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर दात घासल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या.

त्यानंतर कमीत कमी अर्धा तास शारीरिक कसरतीचा व्यायाम करा. (चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे, योगासने करणे) शक्य नसल्यास अर्धा तास सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जा.

सकाळच्या नाश्त्यामध्ये कोणताही तेलकट पदार्थ खाऊ नका. त्या ऐवजी ताज्या फळांचा रस, दुध, सूप, मोड आलेले कडधान्य अशा गोष्टींचा समावेश करा. दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. दुपारच्या जेवणात घरचे जेवण करा.

शक्य झाल्यास जेवणानंतर ताक, नारळपाणी अश्या गोष्टी घेऊ शकता. संध्याकाळच्या नाष्ट्यामध्ये पचायला हलक्या असणाऱ्या गोष्टींचा समावेश करा. रात्री हलका आहार घ्या.

तेलकट, मसालेदार पदार्थ, मांसाहार करणे अशा गोष्टी टाळा. नियमित 6 ते 8 तास झोप घ्या. ह्या गोष्टी व्यवस्थित पाळा बघा आपल्या पोटावरची चरबी हळू हळू कमी व्हायला लागेल.

आम्हाला आशा आहे कि पोटाची चरबी वाढू नये यासाठी कोणत्या सवयी आपण स्वताला लावल्या पाहिजेत हे समजले असेल. आपल्याला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा.

ह्या माहितीविषयी आपल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशीच माहिती वाचण्यासाठी आपण इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करा. पोस्ट नोटीफिकेशन सुरु करा.

पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *