चांगली झोप न आल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. झोप ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. कमी-जास्त झोप शरीरातील क्रियांना असंतुलित करते. लहान मुलांसाठी 9 ते 10 तास, तरूणांसाठी 7 ते 8 तास आणि वृद्धांसाठी 5 ते 6 तास झोप आवश्यक असते.
चांगली झोप न घेतल्याने भूक न लागणे. अन्न पचन व्यवस्थित न होणे, डोकेदुखी, कधीकधी चक्कर येणे या आणि अशा अनेक समस्या उदभवतात. म्हणूनच आज आपण जाणुन घेऊयात शांत आणि चांगली झोप लागण्यासाठी सोप्या टिप्स.
झोपायच्या आधी एखादे पुस्तक वाचा किंवा आरामदायी संगीत ऐका. असे केल्याने लवकरच तुम्हाला झोपेची भावना वाटू लागेल. रात्री झोपायच्या आधी मोबाईल वापरू नका.
मोबाईलच्या स्क्रीन मधून पडणाऱ्या निळसर प्रकाशामुळे आपल्याला झोपेवर परिणाम होतो. म्हणूनच चांगली झोप येण्यासाठी रात्री झोपायच्या आधी तासभर तरी मोबाईल वापरू नका. रात्री झोपण्याआधी 10 मिनिट चालण्यामुळे देखील चांगली झोप येते.
रात्री झोपायच्या अर्धा किंवा एक तास आधी कोमट दुधात अर्धा चमच्यापेक्षा कमी जायफळ पावडर मिसळून ते प्या असे केल्याने आपल्याला लवकर आणि चांगली झोप येईल.
रात्री जास्त खाणे टाळा, हलके अन्न खा, झोपायच्या किमान 3 तास आधी रात्रीचे जेवण करा. झोप येण्यासाठी वातावरण तयार करा, म्हणजे बेड सेट करा, लाईट बंद करा. ह्या गोष्टी नियमित केल्याने अंथरून टाकले कि आपल्याला झोपण्याची भावना निर्माण होईल.
दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि जागे व्हायची सवय स्वताला लावा. सुट्टी असो किंवा शनिवार व रविवार असो, दररोज तोच बेडटाइम ठेवा. जर आपल्याला बेडवर पडल्यावर 15 मिनिटात झोप येत नसेल तर उठून काहीतरी करा जे तुम्हाला आरामशीर वाटेल. थोड्या वेळाने तुम्हाला थकवा येईल आणि झोप लागेल.
संध्याकाळी योगा केल्याने ही रात्री चांगली झोप येते. कधीही रिकाम्या पोटी झोपू नका. भूक लागल्यामुळे आपण झोपू शकणार नाही. झोपण्यापूर्वी आपले मन शांत ठेवा, आपल्या मनात येणारे वाईट विचार दूर करा, त्याऐवजी त्या दिवशी आपल्यासोबत घडलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करा.
प्रार्थना करून झोपायची सवय लावा, झोपायच्या आधी त्या दिवसाबद्दल देवाचे आभार मानून, आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सांगा आणि शांत मनाने झोपायचा प्रयत्न करा.
संतुलित झोपेमुळे शरीर आणि मन तंदुरुस्त राहते. म्हणून पुरेशी झोप घेतली पाहिजे. आपल्याला शांत आणि चांगली झोप लागण्यासाठी सोप्या टिप्स ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.
अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.