- आरोग्य

विटामिन A च्या कमतरता असल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

निरोगी शरीरासाठी वेगवेगळ्या विटामिनची गरज असते. आज आपण अश्याच एका विटामिन बद्दल जाणून घेणार आहोत. विटामिन A हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असते. आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी विटामिन A ची आवश्यकता असते. जर आपल्या आहारातून आपण पुरेसे विटामिन ए युक्त घटक घेतले नाही तर आपल्या आरोग्यावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात याची माहिती घेऊयात.

जर लहान मुलांमध्ये विटामिन A ची कमतरता असेल तर लहान मुलांना पोटाचे व श्वसनाचे विकार होऊ शकतात. विटामिन A च्या कमतरतेमुळे उलटी, पोटदुखी, ताप यांसारखे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे विटामिन A युक्त पदार्थ लहान मुलांना द्या. जेणेकरून अशा समस्यांपासून मुले दूर राहतील.

लहान मुलांच्या विटामिन A स्मरणशक्तीची वृद्धी आणि विकास करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी विटामिन A महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे विटामिन A युक्त अन्नपदार्थांचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आईच्या दुधामध्ये विटामिन A असते. लहान बाळांचे दूध पिणे लवकर बंद केल्यास बालकांना दुधातून मिळणारे विटामिन A मिळत नाही. त्यामुळे बालकांच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

विटामिन A ची कमतरता असल्यास दृष्टी कमी होण्याचा धोका असतो. विटामिन A च्या कमतरतेमुळे डोळ्यातील दृष्टीपटलाच्या वाढीला अडथळा होतो आणि त्यामुळे रातांधळेपणा येऊ शकतो.

विटामिन A शरीरामध्ये रक्त तयार करण्याच्या प्रक्रियेस मदत करते. तसेच हाडांच्या वाढीसाठी ही मदत करते. विटामिन A च्या कमतरतेमुळे रक्त वाढीचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच हाडांची वाढ योग्य पद्धतीने होणार नाही. त्यामुळे आपल्या आहारामध्ये विटामिन A युक्त पदार्थांचा समावेश करा.

विटामिन A ची कमतरता असल्यास थोडेसे थोडेसे काम केले तरी लगेच थकवा येतो. विटामिन A हे मुख्यतः भाजी आणि फळे यांमध्ये असते. मांस, मासे हे अन्न सेवन केल्याने आपल्या शरीराला विटामिन A मिळते.

आपल्याला विटामिन A च्या कमतरता असल्यास शरीरावर काय परिणाम होतो? ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *