- आरोग्य

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त टिप्स

इतर भावनाप्रमाणे राग ही एक नैसर्गिक क्रिया आहे. परंतु अनेकदा आपल्याला राग आल्यावर आपण समोरच्या व्यक्तीला वाईट बोलतो नंतर आपण केलेल्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो. त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी टिप्स

बऱ्याचदा राग अनावर झाल्यावर आपण विचारशून्य होतो. स्वताचा विवेक हरवून जातो. अशावेळी घेतलेला कोणताही निर्णय योग्य नसतो. एखाद्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त विचार केला जातो. अशावेळी आपले मन शांत होई पर्यंत आपण संगीत किंवा गाणे ऐकू शकता.  गाणे ऐकल्याने आपला राग लवकर शांत होण्यास मदत होईल.

अनेकजण राग आल्यानंतर तो व्यक्त करण्यासाठी वायफळ बडबड करतात. असे केल्याने समोरच्याचे मन दुखून नाती तुटण्याची भीती असते. यासाठी राग आल्यानंतर काही काळ काही न बोलता शांत बसा. मौन राहिल्याने राग शांत होईल.

राग आल्यावर अनेकदा श्वास जोरात होतो, हृदयाचे ठोके वाढतात त्यावेळी त्यावर नियंत्रण मिळवा. यासाठी मनातल्या मनात एक ते दहा किंवा त्यापेक्षा जास्त अंक मोजण्याचा उपाय करून बघा.

राग आल्यावर शक्य तितके पाणी प्या. पाणी प्यायल्याने डोके शांत होऊन राग कमी होण्यास मदत मिळेल. राग आल्यावर राग शांत करण्यासाठी आपण मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन केल्याने आपल्याला रिलॅक्स वाटेल आणि काही सेकंदातच राग शांत होईल.

पुरेशी झोप नसणे हेही वारंवार राग येण्याचे प्रमुख कारण असू शकते. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड वाढते व लहान-सहान गोष्टींमुळे सुद्धा राग येऊ शकतो. म्हणूनच आपली सारखी सारखी चीड चीड होत असल्यास रात्री पुरेशी झोप घ्या. झोप व्यवस्थित घेतल्याने आपली चीडचीड कमी होईल.

राग आवरण्याच्या पलीकडे गेल्यावर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. याने मन लवकर शांत होते. राग आल्याबर फक्त 4 ते 5 वेळा जरी दीर्घ श्वास घेतला तरी आपला राग बऱ्यापैकी शांत होतो.

बऱ्याचदा आपण राग आल्यावर आदळ – आपट करतो. भिंतीवर हात मारून घेतो. असे केल्याने राग शांत तर होत नाहीच उलट आपण स्वताला इजा पोहोचवल्यामुळे आपल्याला अधिक राग येतो. यामुळेच राग आल्यावर  स्वताला त्रास न करून घेता वरीलपैकी कोणताही एक उपाय करा. आणि आपल्या रागावर नियंत्रण मिळवा.

आपल्याला रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त टिप्स ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *