- आरोग्य

संपूर्ण शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार करा; सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

भारतात प्राचीन काळापासून व्यायामाच्या प्रकारातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणून सूर्यनमस्काराकडे पाहिले जाते. आपण सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपला ताण कमी करू शकता. सकाळच्या वेळी कोवळया सूर्यप्रकाशात पूर्वेला तोंड करून सूर्यनमस्कार करतात.

सूर्यनमस्कार केल्याने शरीर निरोगी आणि तेजस्वी राहायला मदत मिळते. सकाळच्या कोवळ्या उन्हात उभे राहून सूर्यनमस्कार केल्याने आपल्याला विटामिन डी मिळू शकते.

सूर्यनमस्कार करत असताना आपण दिर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडायचा असतो. यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजन वाढण्यास मदत मिळते. चला तर जाणून घेऊयात सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे.

सूर्यनमस्कार केल्याने आपल्या स्नायू आणि हाडे बळकट होतात.पाठ दुखी, कंबर दुखी नाहीशी व्हायला मदत मिळते. उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास सुरूवात होते. पोटाचे स्नायू देखील मजबूत होतात.

शरीरातील सर्व सांधे, स्नायू बळकट होऊन पाठीचा कणा, मानेचे स्नायू लवचिक व्हायला मदत मिळते. शरीरासोबतच पोटाजवळ बराच तणाव वाढतो. हा तणाव आपली पचनक्रिया चांगली करण्यासाठी चांगला असतो.

यामुळे आपली पचनशक्ती सुधारायला मदत मिळते. पचनशक्ती सुधारल्यावर शरीरातल्या अर्ध्या समस्या दूर होतात. सूर्यनमस्कार केल्यानं हृदयविकार, डायबेटीस व उच्च रक्तदाब अशा आजारांपासून बचाव व्हायला मदत मिळते.

सूर्यनमस्कार केल्यानं मानसिक चिंता आणि अस्वस्थता कमी होते. सूर्य नमस्काराच्या नियमित सरावाने शरीर निरोगी आणि मन शांत राहण्यात मदत होते. सूर्यनमस्कार करताना पुढील काळजी घेतली पाहिजे

सूर्यनमस्कार सावकाश तालबद्ध पद्धतीने, गडबड घाईने, जबरदस्तीने घालू नये. चक्कर, मळमळ, गरगरल्यासारखे वाटू लागल्यास एक ग्लासभर पाण्यात थोडी साखर, मीठ टाकून ते पाणी प्या.

हालचाली संथ व नियंत्रित करून श्वसनाची जोड देऊन सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्कार घालून झाल्यानंतर शवासन अवश्य करा. म्हणजे आपले हृदयाचे ठोके  आणि श्वसन सामान्य होईल.

आपल्याला संपूर्ण शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार करण्याचे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.  अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *