- आरोग्य

मोड आलेले कडधान्ये खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

मोड आलेले कडधान्य खाल्याने आपल्या अनेक फायदे होत असतात. मोड आलेल्या कडधान्यामध्ये वेगवेगळे पोषक तत्व असतात. चांगले आरोग्य राखण्यासाठी आपण सकाळच्या नाश्त्याच्या ऐवजी मोड आलेल्या कडधान्याचा आपल्या आहारात समावेश करू शकतो.

मोड आल्याने कडधान्ये पचायला सोपी होत असतात. त्याबरोबरच मोड आल्यानंतर त्यामधील जीवनसत्वांचे प्रमाण हि वाढत असत. चला तर मराठी ज्ञानच्या या लेखात जाणून घेऊयात मोड आलेले कडधान्ये खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

कडधान्याला मोड आणण्यासाठी 6  ते 7 तास पाण्यात भिजवा. त्यानंतर भिजवलेले कडधान्य एका स्वच्छ कापडामध्ये बांधून ठेवा असे केल्याने त्या कडधान्याला मोड येतात. मोड आलेले कडधान्य चवीला स्वादिष्ट आणि पचायला हलकी असतात.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्याने ते पचायला हलके असतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये खाल्याने आपली पचन क्रिया सुरळीत व्हायला मदत मिळेल.

मोड आलेले कडधान्य खाल्याने आपल्या शरीरात लाल रक्त पेशींचे प्रमाण संतुलित राहायला मदत होईल. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये आयरन, कॅल्शीयम, झिंक, मॅग्नीशियम, यासारखी पोषक तत्व आणि अँन्टीऑक्सीडंट असतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये खाल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल.

गर्भवती स्त्रियांनी सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये खाल्याने गर्भाची वाढ चांगल्याप्रकारे होण्यास मदत मिळते. होणाऱ्या बाळाची शारीरिक तसेच मानसीक वाढ व्यवस्थित होण्यास मदत मिळते.

मुग, मटकी, हुलगे, हरभरे अशा कडधान्यांना मोड आणून खाल्याने त्यामधील पोषक तत्वांची वाढ होते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात.

ज्यामुळे मोड आलेले कडधान्य खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. मोड आलेले कडधान्य खाल्याने तुमचं लगेच पोट भरतं आणि वारंवार भुक लागत नाही. सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये खाल्याने त्यामधील ग्लुकोज मुळे आपण दिवसभर उर्जावान राहाल.

मोड आलेले कडधान्य खाल्याने आपल्या शरीरामध्ये रक्तपरीसंचारण चांगल्या प्रकारे होते. परिणामी आपली केस मजबूत आणि दाट होतात. जर आपल्याला डायबेटीस असेल तर आपण मोड आलेल्या मेथी दाण्यांचा आहारात समावेश केल्याने चांगला फायदा होऊ शकतो.

आठवड्यातील काही दिवस आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये एक वाटी मोड आलेले कडधान्य खाऊ शकता. जर आपल्याला मोड आलेले कडधान्य कच्चे खाल्यावर त्याच पचन होत नसेल तर आपण ते थोडे उकडून खाऊ शकता.

आपल्याला मोड आलेले कडधान्ये खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.  या माहिती विषयी आपल्या शंका आणि काही प्रश्न असतील तर ते आपण आम्हाला कमेंटमध्ये कळवा. महत्वाची टीप: महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *