- आरोग्य

केसांना फाटे फुटणे घरगुती उपाय

वातावरणातील धूळ, प्रदूषण, कडाक्याच्या उन्हामुळे केस कोरडे पडणे आणि केसानां फाटे फुटणे ही समस्या अगदी सर्वसामान्यपणे पहायला मिळते. एकाच केसाला दोन विभाजन फुटलेले असतात, यालाच “फाटे फुटणे” असे म्हणतात.

यामुळे आपल्या केसांची वाढ खुंटते. केसांना फाटे फुटले असतील तर आपल्या केसांचा रंग खूप वेगळा आणि विचित्र दिसतो. केसांना फुटलेले फाटे घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

मेथीमध्ये प्रोटीन असतात. केसांची वाढ जलद होण्यासाठी केसांच्या मुळाशी मेथी दाण्यांची पेस्ट लावली जाते. केसांचे फाटे कमी करण्यासाठी देखील मेथी लाभदायक आहे.

यासाठी चार चमचे दह्यात मेथीचे दाणे अर्धा तास भिजवून घ्या त्यानंतर मिक्सरच्या मदतीने याची घट्टसर पेस्ट बनवून हे मिश्रण केसांना साधारण अर्धा तास लावून ठेवा. नंतर शाम्पूने केस धुऊन टाका. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्याने  केसांचा कोरडेपणा दूर होऊन फाटे निघून जातील आणि केसांना मुलायमपणा येईल.

केसांची फाटे फुटण्यापासून सुटका मिळवायची असेल तर कोमट तेल लावणे फायद्याचे आहे. यामुळे केस चमकदार आणि सुंदर होतात. नियमित स्वरुपात तेल गरम करून केसांना मालिश करा. थोडा वेळनंतर केस शाम्पूने धुवा. केसांचे फाटे निघून जाण्यास मदत होईल आणि केसांना चांगले पोषण मिळून त्यांची वाढ होईल.

केसासाठी केळी हे एक उत्तम औषध आहे. केळ्यामुळे केस मजबूत होतात. एक केळी कुस्करून त्यात २ चमचे दही, १ चमचा गुलाबजल, १ चमचा लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकत्र करा.

हा पॅक केसाला लावावा आणि १ तास तसेच ठेऊन काही वेळाने केस धुवून टाकावे. आठवड्यातून २ वेळा असे केल्यास केसाला फाटे फुटण्याचे प्रमाण कमी होते. केसांची चांगली वाढ होईल.

अंड्यात प्रथिने आढळतात. केसांची मुळे मजबूत करण्यासाठी अंड्याचा वापर केला जातो. अंड्यामुळे केसांची कंडीशनिंग देखील होते. तुम्ही अंड्यातील पिवळा बल्क देखील ऑलिव्ह तेलात मिसळून लावू शकता.

यामुळे फाटे जाऊन केसांची चांगली वाढ होईल. आपल्याला केसांना फाटे फुटणे घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा.

माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *