नमस्कार आपले इन्फोमराठी ह्या डिजिटल पोर्टलवर स्वागत आहे, आम्ही नियमित आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो जर आपण अजून हि आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो केले नसेल तर करून घ्या. आता आपण जाणून घेऊयात उद्योजक आनंद महिंद्रानी दखल घेतलेल्या गाडीच्या व्हिडीओ मागची गोष्ट? आणि तो व्हिडीओ बनवणारा ओंकार तोडकर नक्की कोण आहे?
इथून पुढचा लेख ओंकार तोडकर यांच्यासोबत जे बोलण झाल ते पुढीलप्रमाणे, नमस्कार मी ओंकार तोडकर, राहणार खानापूर, जिल्हा सांगली. सध्या मुंबईत आयटी कंपनीत कार्यरत आहे. आता त्या दिवशीचा काही कारणास्तव विटा या तालुक्याच्या ठिकाणावरून खानापूर ला परत येत होतो.
कानात हेडफोन टाकून मस्त मित्राशी गप्पा मारत गाडी रेमटायच काम चालू होतं. वाटेत मला लहान आकाराची जीप दिसली. पाहिली आणि विचार केला की गाडीची माहिती घ्यावी पण आधीच्या काही अनुभवांमुळे म्हटलं नको! अशी लोकं प्रतिसाद देत नाहीत.
तसाच पुढे निघून गेलो! पण काय मनात आलं काय माहीत, पुढे जाऊन गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली, मागून येणाऱ्या लोहार साहेबांच्या लहान जीप वजागाडीला थांबवलं. त्यांना विचारलं, गाडी तयार केली, की विकत घेतली?
ते म्हणाले, घरीच तयार केली. त्यानंतर त्यांनी सगळा किस्सा सांगितला. मला वाटलं की व्हिडिओ बनवावा. गाडी तर सुंदर दिसतच होती पण यामागे असणारी गोष्ट भारी होती मग व्हिडिओ बनवायला पण मजा येईल म्हटलं.
लोहार साहेब म्हणाले की, संध्याकाळ होत आली आहे. आम्हाला पंढरपूर गाठायच आहे तर उशीर होतोय. मी म्हटलं फक्त पाच मिनिटात तुम्हाला रिकाम करतो आणि व्हिडिओला सुरवात केली.
थोडी माहिती घेत असताना एक रिक्षा वाला अप्रूप वाटलं म्हणून थांबला आणि माहिती ऐकू लागला. दोन माणसं समोरासमोर बोलतात असं बोलत होतो आणि ३ मिनिटाच्या व्हिडिओ नंतर त्यांचा निरोप घेतला. लोहार साहेबांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आणि मी माझ्याघराकडे!
घरी जाताना लोहार साहेबांच्या कष्टाचा आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचेच विचार मनात घोळत होता. एखादा अडाणी माणुस आर्थिक आणि शारिरीक परिस्थिती इतकी बिकट असताना देखील या माणसाने हार मानली नाही. २ वर्षे झटला पण मुलाचा चार चाकी गाडीत बसायचा हट्ट पूर्ण केला. म्हटलं यांच्यासाठी काही तरी करायचं.!
नाहीच जमलं तरी आपले आपल्या पैशांची जमवाजमव करून त्यांना कष्टाचं चीज करायचं. घरी आलो आणि व्हिडिओ एडिटिंग ला सुरवात केली. व्हिडिओ तयार झाला आणि माझ्या HISTORICANO चॅनल वर टाकून दिला.
सतीश बडे, किरण मेंगले, निकिता बोलके, श्रीमाला गुडदे अशा एक ना अनेक मित्रांना कॉल करून प्रसंग सांगितला आणि सगळ्यांनी व्हिडिओ share करायची तयारी दर्शवली. मग काय जिकडे तिकडे फक्त लोहार साहेबांची गाडी दिसायला लागली. त्या दिवशी रात्री पासून लोहार साहेबांचा मोबाईल विश्रांती विसरून गेला.
अशी गाडी आम्हाला पण तयार करून द्या! ती गाडी आम्ही पाहिजे तितक्या पैशात विकत घेतो! तुमचं अभिनंदन.! खूप छान आहे गाडी! इत्यादी इत्यादी. असे अनेक Call त्यांना आले.
कॉल येत होते पण मदत मिळत नव्हती मग बडेंनी कल्पना सुचवली की, “ट्विटर वर पोस्ट करा आणि आनंद महिंद्रा ना tag करा.” कल्पना उत्तम होती, कारण आनंद महिंद्रा social media वर active असतात आणि त्यांना अशा टॅलेंट ची कदर आहे. ट्विटर अकाऊंट होत पण खूप दिवस वापरले नव्हते. ट्विटर download केलं, login करून पोस्ट टाकली आणि tag केले आदरणीय महिंद्रा साहेबांना!
दुसऱ्या दिवशी कुणी तरी सांगितल की महिंद्रानी तुझा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यादिवशी आनंद पोटात मावत नव्हता. The Great Mahindra, आणि त्यांनी आपला व्हिडिओ Repost करावा ही न पटण्यासारखी गोष्ट होती! पण तरी हेतू साध्य नव्हता झाला आणि अजून कुठ तरी मागे आहोत असं वाटतं होतं. त्यांच्या पोस्ट वर जाऊन लोहार साहेबांची परिस्थिती कथन करणारी एक कमेंट टाकली.
मला माहित नाही, ती महिंद्राजींनी वाचली म्हणून की काय पण थोड्याच वेळात त्यांचं अजून एक Tweet आले ज्यात त्यांनी बोलेरो गाडी द्यायचं कबुल केलं. म्हटलं आता आपला हेतू साध्य झाला, आणि त्यादिवशी जेवण च केलं नाही. या बातमीने पोट भूक विसरून गेल होत. ही बातमी सर्व News Channel & Portals इथून ते सर्व राष्ट्रीय बातमीपत्रात झळकली.
लोहार साहेब सध्या लोकांच्या भेटी घेण्यात आणि पत्रकारांना bite देण्यात खूप busy आहेत. आपल्या लोकांची कीर्ती सातासमुद्रापर गेलेली पाहून आत्मिक समाधान लाभते.
अशी अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत जे अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण वस्तु बनवत असतात. तुमच्या पहाण्यात आहे का असा कोणी अवलिया? आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अश्याच चांगल्या पोस्ट वाचण्यासाठी इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करा.