डॉ श्रीकांत जिचकर
- गोष्टी

भारतातील सर्वात जास्त शिकलेली मराठी व्यक्ती कोण?

एकोणपन्नास वर्षांत आपण काय काय करू शकतो किती नोकऱ्या करू शकतो आणि किती शिकू शकतो?? म्हणजे तो डॉक्टर होऊ शकतो, तज्ञ वकिल होऊ शकतो, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आयपीएस किंवा जिल्हाचा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी होऊ शकतो, आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होऊ शकतो. किंवा पत्रकारही. इतकंच नाही तर किर्तनकार, आमदार, खासदार किंवा मंत्रीही होऊ शकतो.

infomarathi

यापैकी जास्तीत जास्त दोन ते तीन नोकऱ्या करू शकतो. पण हे सर्व एकाच व्यक्तीने केलं तर!!  नाही नाही ही रजनीकांत यांच्या चित्रपटाची कथा नाही तर, एक असाही मराठी माणूस होता जो भारतातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती म्हणून ओळखला जातो! ही गोष्ट खरी आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच  जणांना कदाचित ठावूक ही असेल की भारतामध्ये एक असा महाराष्ट्राचा सुपुत्र होऊन गेला ज्याच्या नावावर भारतातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणून Limca Book of Records मध्ये नोंद झाली होती.

तो मराठी माणूस म्हणजे डॉ श्रीकांत जिचकर होय! शैक्षणिक क्षेत्रातील ‘महामेरू’ म्हणून संबोधतायेईल, असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकार होय. अवघ्या ४९ वर्षांचं जीवन, ४२ विद्यापीठं, २० पदव्या आणि २८ सुवर्णपदकं असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला. IAS असो वा IPS, LLM असो वा MBBS, देशातील बहुतेक सर्वच पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.

जिचकारांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे. जिचकरांनी १० विषयांत एम ए केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे. बरं या पदव्या मिळवायच्या म्हणून नाही मिळवल्या तर जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत. 

infomarathi

श्रीकांत जिचकार यांनी आपल्या करीयरची सुरुवात एका डॉक्टरच्या रुपात केली. त्यासाठी त्यांनी MBBS, MD ची पदवी घेतली. पुढे त्यांनी जिचकार यांनी १९७८ साली यूपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षात म्हणजे १९८० साली त्यांनी आयएएसची पदवी खिशात टाकली. तीही नोकरी त्यांनी चार महिन्यात सोडून दिली. विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला.

या महान बुद्धिवंताने वयाच्या २५ व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते. जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता. यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली. १९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. जिचकार १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम केले.

जिचकारांचा २००४ साली अपघातीमृत्यु झाला आहे. जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे. जिचकार यांना गीता, उपनिषद, वेद-पुराण इत्यादी ग्रंथांचे खूप खोल ज्ञान होते. अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेले जिचकर एक पेंटर, प्रोफेशनल फोटोग्राफर, स्टेज एक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ पण होते. लोकसभेच्या रिंगणात मात्र जिचकारांचा पराभव झाला. १९९९ साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा ३००० मतांनी पराभव झाला.

पण हा पराभव त्यांचा नसून त्या मतदार संघातील मतदारांचा झाला. कारण इतका बुद्धिमान आणि प्रतिभावान व्यक्ती असून सुद्धा डॉ. श्रीकांत जिचकर यांनी भारतालाच आपली कर्मभूमी बनवली आणि देशवासीयांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.

माहिती संकलन-विजयश भोसले, माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला इमेलद्वारे पाठवू शकता.

4 thoughts on “भारतातील सर्वात जास्त शिकलेली मराठी व्यक्ती कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *