गावाचं स्वतःच एक वैशिष्ट्य असतं, आणि प्रत्येक गाव आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख सांगत असते. आपल्यापैकी बहुतेक लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये थंड हवेच्या ठिकाणी जाणं पसंत करतात. त्यातल्या त्यात सर्वाधिक पसंती महाबळेश्वर ला असते. पण आज आपण महाबळेश्वर ची एक वेगळी ओळख पाहणार होत. महाबळेश्वर च्या कुशीत वसलेले एक आगळंवेगळं गावं.
इंग्लडमधील ‘हे ऑन वे’च्या धर्तीवर भारतातील हे पहिले पुस्तकांचे गाव विकसित करण्यात आले आहे. या गावात येणारे पर्यटक कोणतेही पुस्तक विनामूल्य वाचू शकतात. गावातील प्रत्येक घरात वेगवेगळ्या विषयांवर असंख्य पुस्तकं वाचकांसाठी आणि पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.
भारतातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ अशी वेगळी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात मागच्या दोन वर्षातच दीड लाखांपेक्षा जास्त वाचक पर्यटकांनी भेट दिली. या गावातील गावकऱ्यांनी आणि हौशी पुस्तक प्रेमींनी आपल्या खास वाचक पर्यटकांसाठी ३० हजारहून अधिक पुस्तकांचा अमूल्य खजिना उपलब्ध केला आहे.
भिलार या गावात ४ मे २०१७ या दिवसाशी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मार्फत हे अनोख पुस्तकांचं गाव भिलार साकारण्यात आलं. पर्यटकांसामध्ये किंवा आपल्या सर्वांमध्ये वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास याचे प्रत्येक घरात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालन उभी केली आहेत.
गावकऱ्यांनीच निवडलेल्या २५ घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. चित्रानुसार त्या घरात वाचकाला कोणत्या प्रकारचे साहित्य उपलब्ध होते याचा अंदाज येईल. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे.
ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड;मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते.
असं म्हणतात की पुस्तकं आयुष्याला वळण देतात. पुस्तकातून मिळणारे अनुभव म्हणा, किंवा पुस्तकातून मिळणारे विचार, ज्ञान आपल्या बळकट करतात. शासनाचा पुढकार आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणार पुस्तकांचे गाव भिलार हा अभिवन उपक्रम आहे. या आगळ्यावेगळ्या आणि आदर्श गावाचा महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने आदर्श घ्यायला हवा. मग कधी भेट देताय या गावाला.!
Absolutely_oustanding
मला तर आत्ता भेटुया जावं वाटतया पण आता नाही येऊ शकत. छान छान गांव आहे तुमचं मी येईलच कधी ना कधी