जयपूर-आग्रा रोडवर आभानेरी नावाचे एक लहान शहर आहे. हे स्थान रोमांचक पायर्यान असलेल्या चांद बावडी आणि हर्षत मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. आभानेरीचे जुने नाव ‘आभा नगरी’ (म्हणजे शायनिंग सिटी) होते, परंतु कालांतराने अपभ्रंश झाल्यामुळे त्याचे नाव आभानेरी बनले.
भारताच्या इतिहासामध्ये अनेक मानवनिर्मित तलाव, आणि विहिरींचा उल्लेख आढळतो. आत उतरून जाता येईल अश्या पायऱ्या असणाऱ्या विहिरीला बाव म्हटले जाते. राजस्थान राज्यामध्ये अश्या अनेक मोठमोठ्या बावी बनविल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अभाव अश्या ठिकाणी जमिनीखाली पाणी लागेपर्यंत खोलवर खणून, पाण्याचे स्रोत म्हणून बाव बनवल्या जायच्या.
राजा चांद यांनी ८ व्या आणि ९ व्या शतकात ही बावडी बनवून घेतली आणि तिचे नाव चांद बावडी असे ठेवले. ही बाव सुमारे १००० वर्ष जुनी आहे. स्थानिक लोकांना वर्षभर शुद्ध पाणी मिळावे यासाठी ही बाव बनवण्यात आली. आजही अभनेरीचे स्थानिक लोक एकत्रित येण्यासाठी या ठिकाणाचा उपयोग करतात. ते विहिरीभोवती बसतात. उन्हाळ्याच्या दिवसांत तळाशी थंड वातावरण असते.
चांद बावडी हे भारतीय भव्य वास्तुशिल्प कौशल्यासाठी ओळखले जात. चांद बावडीची भव्यतेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता चांद बावडीची १३ मजले खाली आहे आणि अंदाजे ३५०० पायऱ्या आहेत. जवळजवळ १०० फूट खोल, पायऱ्यांचे चौरस बांधकाम आहे ज्याच्या प्रत्येक बाजूला ३५ मीटर आहे. असे मानले जाते की पायर्याूचा खालचा भाग ८ व्या ९ व्या शतकात बांधला गेला होता तर वरचा भाग १८ व्या शतकात मोगल काळात पूर्ण झाले होते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही बाव अगदी वरपर्यंत भरते असे म्हणतात. या बावडीमध्ये दोन भुयारे असून, एका भुयाराचे नाव ‘अंधेरी’ आणि दुसऱ्या भुयाराचे नाव ‘उजाली’ असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.या बावडीची रचना आणि बनावट भारतीय स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.
चांद बावडी आभानेरी जवळ भेट देण्याची ठिकाणे:
जर आपण राजस्थानमधील आभानेरी गावी जाण्याचा विचार करीत असाल तर बरेच काही आहे जे आपण आभानेरी गावात फिरू शकता.
हर्षत माता मंदिर:
हर्षत माता मंदिर चांद बावडीच्या शेजारी असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे जे पर्यटक आणि भक्तांनचे आकर्षण केंद्र आहे. इस्लामिक राज्यकर्त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केल होत आता येथे अवशेष शिल्लक आहेत. येथे आपण भव्य खुल्या प्रांगणात स्तंभ आणि भिंतींवर कोरीव कामांसह अद्भुत मूर्ती पाहू शकता. या मंदिराची सद्यस्थिती पाहून जुन्या काळात मंदिराच्या वैभवाचा अंदाज आपन लावू शकतो. हे मंदिर येथे येणारया पर्यटकांना निराश करत नाही. मंदिर आणि त्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे तुम्हाला भुरळ पडू शकते.
माधोगढ किल्ला:
दौसा येथील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी माधोगढ किल्ला एक आहे. हा किल्ला जयपूरच्या राजा माधव सिंग यांनी बांधला होता. हा किल्ला सुंदर फुलांच्या शेतात पार्श्वभूमीवर डोंगराच्या माथ्यावर आहे. ज्यामुळे तो एक अतिशय सुंदर आणि आकर्षक किल्ला बनतो. हा प्राचीन किल्ला आता शाही हॉटेलमध्ये रुपांतरित झाला आहे. माधोगढ किल्ला अशी जागा आहे जिथे आपण आपल्या मित्रांसह आणि आपल्या कुटूंबासमवेत भेट देऊ शकता.
चांद बावडीला कसे पोहोचाल:
जयपुर शहरापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या आभानेरीमध्ये चांद बावडी आहे. आपण आभानेरी सहज प्रवास करू शकता. रेल्वे मार्गाने प्रवास करायचा असेल तर आभानेरीचे सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन जयपूर आहे. येथे जाण्यासाठी देशातील सर्व प्रमुख स्थानकांमधून गाड्या पकडू शकता.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.
Very nice information ..
And thanks for sharing
खूप छान आणि विसृत माहिती मिळाली
धन्यवाद !