प्रदूषण, धूळ यामुळे चेहऱ्यावर काळे डाग येतात. हे काळे डाग घालविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. तरीही हे डाग जात नाहीत. तरुण वयात येणारे हे काळे डाग सौंदर्य कमी करतात. यासाठी काही घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील काळे डाग सहज घालवू शकता.
चेहऱ्यावरील काळे डाग घालविण्यासाठी एक टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर एका वाटीमध्ये ताक घ्या. त्यामध्ये टोमॅटोचा गर मिसळून घ्या. चांगल्या प्रकारे एकत्र करून आपल्या चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनी चेहरा धुऊन टाका असे केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील.
चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालविण्यासाठी एक चमचा मीठ आणि साखर यांचे मिश्रण एकत्र करून काळे डाग असलेल्या भागावर लावा. मिश्रण सुखल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. काळे डाग निघून जातील.
मुरूम येऊन काळे डाग पडतात. अशावेळी हे डाग हलक्या रंगाचे असताना जर त्यावेळी योग्य घरगुती उपाय केल्यास डाग निघून जातील. यासाठी मध हा सोप्पा उपाय आहे. मध काळे डाग आलेल्या ठिकाणी लावून मसाज करा. काही वेळाने चेहरा स्वच्छ धुवा. डाग निघून जातील.
दुधात चंदन पावडर मिसळून याची पेस्ट चेहऱ्याला लावा. संपूर्ण सुखल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चेहरा कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळेस केलात तर काळे डाग सहज निघून जातील.
आपल्याला चेहऱ्यावरील काळे डाग दुर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.