gharguti upay kesa galanyavar
- आरोग्य

केस गळणे थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे जी पुरुष किंवा महिला कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकते. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीचा आणि प्रदूषण, धूळीचा परिणाम आपल्या शरीराबरोबरच आपल्या केसांवर हि होताना दिसत आहे.

अकाली केस गळण्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना  टक्कलाचा सामना करावा लागत आहे म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. केस गळणे थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय.

केस गळणे थांबवण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. कांद्याच्या रसामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस वाढण्यास आणि केस दाट होण्यास मदत मिळते. केस गळणे थांबवण्यासाठी 1 कांदा बारीक करून त्याचा रस काढा.

अन आपल्या केसांच्या मुळांसह संपूर्ण केसांवर लावल्याने लवकर फरक दिसेल. कांद्याचा रस केसांच्या मुळांना बळकट करण्यासाठी आणि डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

केस गळणे थांबवण्यासाठी शिर्षासन करा. शिर्षासन केल्याने केसांना रक्तपुरवठा चांगला होतो. केस गळणे थांबवण्यासाठी आपण मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवून घ्या, त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे दही मिक्स करून पेस्ट तयार करा.

मेथी आणि दह्याची पेस्ट केसांच्या मुळाजवळ लावा. अर्धा तास तसेच राहुद्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.  असे केल्याने केसांच्या मूळाशी असणारा कोंडा कमी होतो. त्याबरोबर डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही. हा उपाय केल्याने आपल्याला लवकरच फरक जाणवेल.

केस गळणे थांबवण्यासाठी अर्ध्या कप खोबऱ्याच्या  तेलात एक मूठभर कढीपत्ता घाला आणि गैसवर गरम करा.जेव्हा या मिश्रणाचा रंग  बदलू लागला की गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.

थंड झाल्यावर मिश्रण वस्त्रगाळ करून घ्या. आता हे मिश्रण आपल्या केसांवर आणि टाळूवर लावा आणि अर्धा तास राहूद्या. हे मिश्रण लावल्याने केस दाट होण्यास मदत मिळते. तसेच केस गळणे हि कमी होते.

केस गळणे बऱ्याचदाचुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे होते. तळलेले मसालेदार अन्न पदार्थामध्ये पोषक तत्वांची कमी असते.

ज्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन, आयरन, कैल्शियम जिंक, आणि विटामिन मिळत नाही जे निरोगी केसांसाठी गरजेचे असते. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, सुक्का मेवा, दुध आणि अंडी यांचा समावेश केल्याने आपल्याला नक्की फरक जाणवेल.

आपल्याला केस गळणे थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *