korda khokla ghalvnysathi gharguti upay
- आरोग्य

कोरडा खोकला घालवण्यासाठी घरगुती उपाय

हवामान बदलताच वेगवेगळे आजार व्हायला सुरु होत असतात. खोकला त्यापैकीच एक आजार आहे. लहान मुलांना आणि वृद्ध माणसांना त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने खोकला हा आजार लवकर होण्याची शक्यता असते.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून कोरडा खोकला घालवण्यासाठी घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत. कोरडा खोकला येत असल्यास 1 ग्लास कोमट पाण्यात २ चमचे मध टाकुन दिवसातून तीन ते चार वेळा प्या. असे केल्याने खोकला कमी होण्यास मदत मिळेल.

खोकला येत असल्यास कपभर कोमट दुधात चमचाभर हळद टाकुन दिवसातून तीन ते चार वेळा प्या. असे केल्याने खोकला कमी होण्यास मदत मिळेल.

खोकला येत असल्यास आणि सर्दीने नाक बंद झाल्या सारख वाटत असल्यास आपण गरम पाण्याची वाफ घ्या वाफ घेतल्याने हळूहळू नाक मोकळं होईल आणि श्वास घ्यायला होणारा त्रास हि बंद होईल.

आल्याचा वापर जुन्या काळापासून खोकल्याच्या उपचारासाठी केला जातो. यासाठी आले कापून बारीक करा आणि नंतर ते एका कप पाण्यात 10 मिनिटे उकळवा. दिवसातून 3 ते 4 वेळा घ्या. यामुळे आपला घसा मोकळा होण्यास मदत होईल आणि खोकला सुद्धा कमी होईल.

खोकला येत असल्यास अडुळश्याच्या पानांचा काढा तयार करून दिवसातून ३-४ वेळा घ्यावा. असे केल्याने खोकला कमी होण्यास मदत मिळते.

खोकला येत असल्यास आल्याचा कोरा म्हणजे कोरा चहा दिवसातून तीन ते चार वेळा प्या. असे केल्याने खोकला कमी होण्यास मदत मिळेल.

खोकला येत असल्यास 1 ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे मीठ घालून गुळण्या करा. असे केल्याने आपला घसा मोकळा होईल तसेच खोकला हि कमी येईल.

लसणाच्या काही पाकळया बारीक ठेचुन मधासोबत खाल्याने आपला घसा मोकळा होण्यास मदत होईल आणि खोकला सुद्धा कमी होईल.

खोकला येत असल्यास रात्री झोपण्याआधी ज्येष्ठमधाची छोटीशी काडी चघळत राहिल्यास खोकल्याची उबळ कमी होते. खोकला येत असल्यास तुळशीची पाने चघळा असे केल्याने खोकला कमी होण्यास मदत मिळते.

खोकला येत असल्यास डाळिंबाची साल बारीक करुन घ्या. कोमट पाण्यासोबत प्या. असे केल्याने आपला घसा मोकळा होण्यास मदत होईल आणि खोकला सुद्धा कमी होईल.

आपल्याला कोरडा खोकला घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *