papai fal khanyache fayde
- आरोग्य

पपई खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

पपई हे एक असे फळ आहे की आपल्याला ते  सहज कुठे हि  मिळू शकते. पपई आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे. पपईमध्ये खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. आज जाणून घेऊयात पपई खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

पपई कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, पपईमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात. याबरोबरच पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट्स देखील असतात.

पपईमध्ये आपल्या शरीरास आवश्यक व्हिटॅमिन सी हा घटक असतो. जो आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. जर तुम्ही दररोज काही प्रमाणात पपई खाल्ली तर आजारी पडण्याची शक्यता कमी होईल.

पपईमध्ये रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक असणारे मॅग्नेशियम हे खनिज असते. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे ते दररोज आपल्या आहारात पपईचे सेवन करू शकतात.

ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान पोट दुखी होत असेल त्यांनी आपल्या आहारात पपईचा समावेश अवश्य करावा. पपई खाल्याने पपईच्या मासिक पाळी नियमित होण्याबरोबरच वेदनाही कमी होतात.

चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी सुद्धा पपई गुणकारी आहे. पिकलेल्या पपईचा किस चेहऱ्यावर लावल्यानं चेहरा उजळतो. तसेच पुटकुळ्या, मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत मिळते.

आपण प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईचे सेवन करू शकता. पपईमध्ये प्लेटलेट्स वाढविण्याची क्षमता असणारे विविध प्रकारचे सामर्थ्ययुक्त आम्ल आहेत. पपई केसांसाठीही चांगले आहे. पपईची पेस्ट केसांना लावल्याने केस दाट होतात. तसेच केसांमधील कोंडा हि कमी होतो.

पपई खाल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पपईमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ चे प्रमाण चांगले असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्हिटॅमिन ‘ए’ आवश्यकता असते. वयानुसार दृष्टी चांगली राहण्यासाठी पपई खाणे चांगले असते.

आपल्याला पपई खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे  ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *