sakali upashi poti lasun
- आरोग्य

सकाळी उपाशी पोटी 1 पाकळी लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बाजारात व स्वयंपाकघरात बाराही महिने सहज मिळणारा पदार्थ म्हणजे लसूण. लसणाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व दिलेले आहे. लसणामध्ये सल्फरचे प्रमाणा अधिक असते. लसूण शरीराला अनेक आजारांपासून लांब ठेवतो.

लसणामध्ये एलिसीन नावाचा घटकही असतो. अँटी ऑक्सिडेंट, अँटी- बॅक्टेरिअल, अँटी – फंगल आणि अँटी – व्हायरल असे गुण असतात. हाच लसूण जर सकाळी अनोश्यापोटी खाल्ला तर त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात.

तर पाहुयात सकाळी लसूण खाण्याचे फायदे. लसूण आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतो. लसणाच्या 1 पाकळी  नियमित सेवनाने रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.

लसून शरीरात खराब कोलेस्ट्रॉल निर्माण होऊ देत नाही. अनाश्यापोटी कच्च्या लसणाची एक पाकळी मधासोबत खाल्ल्यास हृदयाचा रक्त प्रवाह सुरळीत रहातो.

ज्यांना अपचनाचा त्रास सारखा होतो. त्यांनी सकाळी लसणाची एक पाकळी चावून खावी. हा अपचनावर चांगला उपाय आहे तसेच याने भूक वाढण्यास देखील मदत होते.

लसूण आपल्याला सर्दी खोकला सारख्या त्रासापासून देखील सोडवते. यामध्ये अवलिसिन नावाचं कम्पाउंड आढळते जे सर्दी खोकल्यापासून बचाव करते. सर्दी झाली असेल तर सकाळी लसूण अवश्य खावा.

पुरुषांनी सकाळी लसून खाल्याने लसणामध्ये असलेल्या सेलेनियम आणि व्हिटामीनमुळे स्पर्म क्वालिटी वाढण्यात मदत होते. जुलाब व बद्धकोष्ठता या परस्परविरोधी व्याधी आहेत परंतु या दोन्ही व्याधींवर लसूण गुणकारी आहे.

लसणामधील अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म पोटातील जंतू नष्ट करतात. यासाठी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या पाण्यात टाका. या पाण्याला एक उकळी द्या. हे पाणी सकाळी अनोश्यापोटी सेवन केल्याने जुलाब असो वा बद्धकोष्टता दोन्ही समस्या दूर होतात.

लसणामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते जे आपल्या हाडांना व दातांना निरोगी व बळकट करते. यासाठी लसणाचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे. पाण्यासोबत कच्चे लसूण खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.

ज्यांना ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवायचं आहे त्यांच्यासाठी लसूण एक उत्तम पर्याय आहे. लसणाची पाकळी सकाळी अनाश्यापोटी खाल्ल्यास रक्तदाबाचा त्रास जाणवत नाही.

आपल्याला उपाशी पोटी 1 पाकळी लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *