tips to get hungry
- आरोग्य, इन्फोमराठी

भुक लागत नाही, मग हे १० उपाय कराच.

अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या खान-पानामुळे ऍसिडिटी, गॅसच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांमुळे हळूहळू भूक कमी होऊ लागते. खायची इच्छा न होणे, तोंडाला चव नसणे, थोडं खाऊन ही पोट जड होणे ही सगळी भूक न लागन्याची लक्षणे आहेत.

यावर खालील घरगुती उपाय करता येतील जेणेकरून या समस्येवर आपण मात करू शकतो.

जेवणात पुदिना, आले, लसूण, यांची चटणी खाल्ल्यास तोंडाला चव येते आणि भूक लागते. आणि जेवणात वाढ होते.

Pudina, Garlic, Ginger

जेवण झाल्यानंतर ओव्याचे चूर्ण थोड्याशा गुळासोबत कोमट पाण्यातून घेतल्यास जेवण सहजतेने पचते आणि योग्य वेळेला भूक लागते.

महत्वाचे म्हणजे जेवणा आधी पाणी पिणे टाळावे, दिवसा झोपू नये, नियमित व्यायाम करावा. यामुळे योग्य वेळेला भूक लागते.

वेलची ही थंड असते वेलची आपल्या शरीरात गारवा निर्माण करते, वेलची चे दाणे एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या हे पाणी थंड झाल्यावर प्या. हे पाणी औषधा सारखे काम करते ज्यामुळे आपली भूक वाढण्यास मदत होते.

Ilaychi

आपल्या घरात असणारा हिंग हा सुद्धा कृमिनाशक अन् भूक वाढवणारा आहे. त्यामुळे वातही नाहीसा होतो.

आपल्या जेवणामध्ये साजूक तूप आणि जेवणानंतर ताक या पदार्थांचा वापर असायला हवा. हे दोन्ही पदार्थ भूक वाढवणारे आहेत.

भुक वाढण्यासाठी गरम पाण्यात लिंबू सरबत करून थोडे थोडे सरबत थोडया थोडया वेळाने घ्यावे. पचन सुधारून भूक लागण्यास त्यामुळे मदत मिळते.

Nimbu Pani

आले किसून त्याचा रस काढावा. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा आल्याचा रस आणि मध मिसळून दिवसातून दोन वेळा प्यावा.

भुक वाढण्यासाठी गरम पाण्यात लिंबू सरबत करून थोडे थोडे सरबत थोडया थोडया वेळाने घ्यावे. पचन सुधारून भूक लागण्यास त्यामुळे मदत मिळते.

एक चमचा ओवा व चिमुटभर काळा मीठ वाटीभर पाण्यामध्ये मिसळून ते मिश्रण उकळून घ्या थंड झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्या व हे मिश्रण प्या काही दिवस हे मिश्रण दिवसातून एकदा प्या असे केल्याने आपली भूक वाढेल.

आपण जाणूनबुजून आपल्या आहारावर दुर्लक्ष करत असतो, पण अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे आपण आपला आहार योग्य वेळेवर घेऊ शकत नाहीत, कोणाला आपल्या कामामुळे योग्य वेळेवर आहार घेता येत नाही तर कोणाला आपल्या पोटाच्या समस्येमुळे आहार घेता येत नाही. भोजन हे आपल्या साठी सर्वात महत्वाचे आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *