मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

मुख्य उद्दिष्ट: महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवांना व्यवसायिक अनुभव व रोजगार क्षमता वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजना राबविण्याचा उद्देश

राज्यातील शिक्षित युवकांना नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार क्षमता (Employability) वाढविणे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पात्रता

क्रमांकपात्रता
1उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावे
212वी पास, ITI, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण असावे
3उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
4आधार कार्ड असावे व बँक खाते आधार संलग्न असावे
5कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी

आस्थापना/उद्योगासाठी पात्रता

क्रमांकपात्रता
1आस्थापना/उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा
2कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी
3आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षे जुनी असावी
4EPF, ESIC, GST, Certificate of Incorporation, DPIT व उद्योग आधार नोंदणी केलेली असावी

प्रशिक्षणाचा कालावधी व वेतन

क्रमांकशैक्षणिक अहर्ताप्रतिमाह वेतन (रु.)
112वी पास6,000/-
2ITI/ पदविका8,000/-
3पदवीधर/ पदव्युत्तर10,000/-

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाप्रमुख वैशिष्ट्ये

  • ऑनलाईन नोंदणी व प्रक्रिया
  • उद्योग व बेरोजगार युवांमध्ये समन्वय
  • उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण
  • प्रशिक्षण कालावधी 6 महिने
  • प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महत्वाच्या अटी

  • उमेदवाराने एका वेळेसच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • प्रशिक्षण काळात उमेदवाराची उपस्थिती ऑनलाईन नोंदविण्यात येईल.
  • 10 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असलेल्या उमेदवाराला त्या महिन्याचे वेतन मिळणार नाही.
  • उमेदवाराने प्रशिक्षण सोडल्यास वेतन देय राहणार नाही.

अपेक्षित परिणाम

  • युवकांना व्यवसायिक अनुभव व नोकरी मिळण्याची क्षमता वाढविणे.
  • उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे.

निष्कर्ष

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्रातील युवकांना शिक्षणानंतर त्वरित नोकरी मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या योजनेच्या माध्यमातून युवकांना अनुभव मिळविण्यासोबतच उद्योगांच्या गरजांची पूर्तता होईल.

माहिती पत्रक

https://rojgar.mahaswayam.gov.in/CMYKPY_Note_v6.0.pdf

नोंदणी वेबसाईट

https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *